गझल : अशोक पाटील माहुरे

 

 
१.

जुलुम करणारेच बघ बेजार झाले
सोसणे आता गड्या हे फार झाले

चालतो शिमगा इथे येता दिवाळी
सांग कुठले स्वप्न ते साकार झाले

हाय,जडली आज व्याधी औषधाला
रोग पुरतो...घातकी उपचार झाला

ही कशी किमया अरे ह्या कलियुगाची
माणसांचे राक्षसी अवतार झाले

केवढी श्रीमंत ही भाषा मराठी
बोलणारे लोक का नादार झाले
...........................................
 
अशोक पाटील माहुरे
मु.पो.काठोडा
ता. आर्णी,जि. यवतमाळ.

No comments:

Post a Comment