१.
पैशाविना बिचारी बेजार फार होती
लाचार जिंदगानी नुसती भिकार होती
फेकून पुस्तके मी कामास दूर गेलो
होत्या घरात बहिणी आई बिमार होती
घेऊन लाख स्वप्ने तुज भेटण्यास आलो
कायम दरी तरीही दोघात यार होती
मी शिकविले जयांना पक्ष्यास हेरण्याचे
त्यांनीच आज माझी केली शिकार होती
पोटामुळे जरासा बदनाम काय झालो
म्हणतात लोक माझी आदत टुकार होती
बघ सत्य बोलण्याची इतकी सजा भयंकर
लटकावण्यास मजला फाशी तयार होती
शेख गनी,
मुळावा
मुळावा
मो. 9673185942
No comments:
Post a Comment