दोन गझला : अभिषेक उदावंत



१.

बघता बघता सुंदर भिंती काळ्या झाल्या
कमी लेखण्यासाठी सुध्दा टाळ्या झाल्या

खुली मोकळी जागा  म्हणजे धोका आहे
शंका आली चिंतेभवती जाळ्या झाल्या

प्रसंग नसला तरी बायको नटते थटते
याचाच अर्थ घरात जवान साळ्या झाल्या

डिलेवरीला मणी, डोरले गहाण पडले
हौसेखातर बाळासाठी बाळ्या झाल्या

गोरी मुलगी लग्नासाठी भारी नाही
वय वाढले खेड्यात मुली काळ्या झाल्या

 २.                         

बघ चिमणीचा खोपा दिसतो
अवती - भवती धोका दिसतो

कसे मुलीचे लग्न करू मी
मला सारखा झोका दिसतो

कामाचा उंदीर धावतो
साहेबाचा बोका दिसतो

घड्याळचे त्या काटे काढा
मला नेहमी ठोका दिसतो

रोज मुलांचे अंगण रडते
स्मार्ट फोनचा धोका दिसतो

श्रीमंतांच्या पाठीमागे 
पैसा , पेटी , खोका दिसतो
..........,....................................
 
अभिषेक उदावंत
अकोला .

1 comment: