गझल : अतुलकुमार ढोणे

 

१.

नाही अजून माझ्या देशात लोकशाही
मश्गूल जाहली बघ पैशात लोकशाही

माडीत मेजवान्या खाया पुलाव रस्सा.. 
वस्तीत वाटते मग खैरात लोकशाही
 
मी हारलो निसर्गा समजू नको असे तू 
बघ पेरली नव्याने शेतात लोकशाही
 
झाला उजाड सारा समृद्ध देश माझा.. 
येथे न कोणत्याही पक्षात लोकशाही 

पान्हा कुठून आणू पाजावया मुलांना.. 
आटून पार गेली वक्षात लोकशाही
.........................................
अतुलकुमार ढोणे
डेहणी,बेंबळा नदी प्रकल्प,           
 जि. यवतमाळ
संपर्क : 7249429874

1 comment: