एक गझल : अक्षय गहुकार




१.

बांधता आला जरी ना,ताज मजला.
येत नाही झोपडीची,लाज मजला

मी तुझा शाहाजहां या झोपडीचा
साजणी तू वाटते मुमताज मजला

संकटा तू ये कितीही आड माझ्या
पण खरा आला तुझा अंदाज मजला

वाढला पैसा म्हणा की मान माझा.
पण कधी आलाच नाही माज मजला

जर गरज माझी कधी तुज भासली तर
तू गड्या बिनधास्त दे आवाज मजला.

.................................................................................

अक्षय गहुकार (परसोडी)

1 comment:

  1. सुंदर

    तू गड्या बिनधास्त दे आवाज मजला...👌🌹

    ReplyDelete