१.
होईल काय जे, ते नंतर बघून घेवू
झुकवू नकोस डोळे नंतर बघून घेवू
मयतात फेकलेले उचलून आण पैसे
पोटात आग आहे नंतर बघून घेवू
नाहीच भेटला जर घामास भाव माझ्या
दे पेटवून वावर नंतर बघून घेवू
ही रात आजची रे काढू कशी तरीही
सुर्यास झोपलेल्या नंतर बघून घेवू
पडतील कैक भेगा पायास चालतांना
ही वाट संपल्यावर नंतर बघून घेवू
................................................
दिनेश मोडोकार
पाथर्डी, तेल्हारा
जि अकोला
No comments:
Post a Comment