अर्थ स्वाहा शब्द स्वाहा
होत आहेत मर्म स्वाहा
भस्म झाल्या सर्व गोष्टी
झाला जर संदर्भ स्वाहा
डोळे चोळत पाहतो तर
दृश्य स्वाहा स्वप्न स्वाहा
तोंड फाडून गर्व करतो
ताज स्वाहा तख्त स्वाहा
मंत्र गुणगुणतंय असे कोण?
अत्र स्वाहा तत्र स्वाहा
या जगाच्या यज्ञकुंडात
शेवटी सर्वस्व स्वाहा
........................................
अनुवाद : हेमंत पुणेकर
मूळ गझल : गुजराती
No comments:
Post a Comment