१.
तव दर्शना मिळाया रांगेत चालले मी
साक्षात देव माझ्या ह्रदयात भाळले मी
ती वादळे नभाची माझ्या कडे वळाली
वणव्यात सावल्यांच्या शोधात धावले मी
पुष्पास तोडताना काटे रुतून आले
अंगावरी फुलांच्या स्पर्शान बहरले मी
अंधार वाट झाली सरता अबोल वाणी
चंद्रास पाहिले अन् मौनास तोडले मी
दाही दिशा हरवल्या निस्तेज ह्या क्षणाला
ह्रदयात साठलेल्या तेजात मिसळले मी
२
या निसर्गाला कुणाची लागली आहे नजर
माणसाने माणसाची खोदली आहे कबर
राहिले नाहीत जंगल का उगाचच जाळले
राख केली माणसाने साधली आहे डगर
पशु फिरत आहेत साधी माणसे गेली कुठे
मारत मरत जगत त्याने पाजले आहे जहर
वाहले नाले नदी अन् पूर आले वेगळे
कोरडा रुष्क भासला तो मानवी आहे सुवर
माणसा रे माणसा का लाज वाटे ना तुला
बोचला निसर्ग स्वताचा ओढला आहे पदर
...............................................
सौ. दिपाली महेश वझे,
बेंगलोर
९७१४३९३९६९
फार सुरेख !
ReplyDeleteधन्यवाद कल्याणी 🙏🙏
ReplyDeleteदीपाली ताई, खुप सुंदर झाल्यात दोन्ही गजल.
ReplyDelete"चंद्रास पाहिले अन् मौनास तोडले मी" काय भाव मांडलेत व्वा.
छान
ReplyDelete