दोन गझला : जयकुमार वानखेडे

 

 
१.
  
मनाचॆ दु:ख हॆ लपवून हसण्याची कला शिकवा..
मला गुरुजी,कलॆवर प्रॆम करण्याची कला शिकवा...

सुखांचा हात धरुनी चालते होतात सारेजण...
मला इथल्या दुखांचा हात धरण्याची कला शिकवा...

जगाला खूप आवडती म्हणॆ, गोष्टी चमकणाऱ्या..
मला ताऱ्यांपरी येथे चमकण्याची कला शिकवा..

नको तलवार ,चाकू , दांडपट्टे ,ढाल अन् भालॆ..
मला बस...लॆखणीनॆ युद्ध लढण्याची कला शिकवा..

नभाचे स्वप्न पेरा कोवळ्या मेंदूत पोरांच्या..
मुलांना आपल्याही उंच उडण्याची कला शिकवा..
 
२.
प्रयोग माझ्यावरही केला दमादमाने..
अन् मग कावा तडीस नेला दमादमाने..

एका दमात खाणे त्याला शक्यच नव्हते..
हलाल केला अख्खा हेला दमादमाने..

उगाच नाही जहर म्हणत ह्या प्रेमाला मी..
प्रेम तिच्यावर करून मेला दमादमानॆ..

काळजास ह्या अपुल्या,आधी सक्षम बनवा..
येणारी मग दुःखे झेला दमादमानॆ..

गुरू बिचारा मागे मागे राहत गेला ..
समोर गेला निघून चेला दमादमानॆ..
.....................................
 -  जयकुमार वानखेडे, जवळा.

No comments:

Post a Comment