१.
गुंत्याची जर उकल पाहिजे...
काळा नुसार बदल पाहिजे...
चार लिहाव्या आधी ओळी
चिंतन, नंतर गझल पाहिजे...
मोक्ष भेटण्या या दे हा ला
चौऱ्यांशीची सहल पाहिजे...
आहे त्या तू लयीत घे ना
का श्वासाची उचल पाहिजे?...
साध्य तुलाही सहज अरू हे
फक्त नव्याचे नवल पाहिजे...
२.
प्रचंड झाले नवा कशाला...
नवीन झेंडा हवा कशाला...
घरात आहे जुनाट बटवा
महाग घेऊ दवा कशाला...
समेट घडला नव्या मताने
तरी जुना गवगवा कशाला...
उभे तुला मोकळे नभांगण
उडायचे थांबवा कशाला...
युगायुगांची प्रथा अघोरी
उगीच ती जोजवा कशाला...
...............................................
अरविंद उन्हाळे
अरविंद उन्हाळे
भोन, संग्रामपूर
मस्त
ReplyDelete