गझल : गिरीश खोब्रागडे



१.
                       
अन्यायाशी लढतांना मी शरमत नाही..
म्हणून मजला येथे कोणी अडवत नाही..

रक्तामध्ये रोज माझिया वादळ असते..
 दारी माझ्या म्हणून संकट भटकत नाही..

येथे माझ्या सोबत असतो बुद्ध नेहमी  ..
दुःख मनाला म्हणून माझ्या पकडत नाही..

बोलत असती रागाने मज जेव्हा मोठे..
 स्वर मी तेव्हा मोठ्या समोर चढवत नाही..

 शत्रू माझे डावपेच करतात हजारो
पण मी त्यांच्या डावांमध्ये अडकत नाही..
.........................................

 गिरीष खोब्रागडे 
 ब्राम्हणवाडा (पूर्व )
 संपर्क : 8263912741

1 comment: