१.
जेव्हा कुठेही भेटतो हरवून जातो
तो काय माझ्या आतले वाचून जातो
गझलेतुनी बोलू जरासे वाटल्यावर
मी नेमका तो काफिया विसरून जातो
घायाळ होती लोक जर मी बोललो तर
साधा सरळ मी शेर , पण भेदून जातो
मृत्यूस का माझ्या मिठीची आस नाही
जातो जवळ मी आणि तो टाळून जातो
माझ्यातला दरवळ कधीही जात नाही
हा कोण माझ्या आतला बहरून जातो
२.
गुंतला नाही कधीही जीव कोणातच
एवढा मी गुंतलो दररोज माझ्यातच
तू अहिंसेची कशाला ओढतो चादर
शान योध्याची खरी तर फक्त लढण्यातच
ही तुझी वृत्ती तुझी भाषा तुझी गाणी
ठेवली होती गझल तू खोल जगण्यातच
खूप फॉर्मल बोलणे होते तुझे माझे
गोडवा आला कुठे ना मूळ नात्यातच
आजची अपुली अवस्था वेगळी असती
ठेवले असतेस काही फक्त दोघातच.
..............................................
दर्शन वि शहा 'स्नेहदर्शन'
हैदराबाद
मो 9652352521
No comments:
Post a Comment