१.
एकदा भेटून जा...
काय ते सांगून जा...
स्पष्ट मी बोलू कसे?
तू नजर समजून जा...
घाट प्रेमाचा बिकट
फार सांभाळून जा!
"साथ" वाढत चालली
मुखवटा घालून जा...
यायचे तर पूर्ण ये
नाहितर सोडून जा!
तेच आठवशिल किती?
सोड ते... विसरून जा...
केव्हढा पळतोस रे!
एक क्षण थांबून जा...
झाड त्यांना तोडु दे
तू बिया पेरून जा!
जन्म मिळतो एकदा
कारणी लावून जा!
तू नको शायर बनू
तू गझल होऊन जा!
जग बदल नंतर 'असो'
तू प्रथम बदलून जा!
२.
स्पष्ट काहीही दिसत नाही
मी तरी चष्मा करत नाही!
जग कधीचे चालते आहे
पण कुठेही पोहचत नाही!
इंडिकेटर ऑन करतो पण
मी सरळ जातो... वळत नाही!
दूर जाता येत नाही अन
सोबतीने राहवत नाही!
सावल्यांचा वाढतो गुंता
याचसाठी मी जळत नाही!
दिवसभर चालूच असतो नळ
बादली मग का भरत नाही?
काय सांगू कोण मी आहे
मी स्वतःला ओळखत नाही!
आरसा बस वर्ख दाखवतो
आतमधले दाखवत नाही!
पत्र पाठवतोस दुसऱ्यांना
का स्वतःला पाठवत नाही?
काय मज सांगायचे होते?
सोड आता... आठवत नाही!
आणखी वाढवू नका गर्दी!
रोज भेटायला तुला आलो
रोज बस भेटली मला गर्दी!
मी कसा पार तो करू रस्ता
आठवांची जिथे तुझ्या गर्दी!
कोण बुडत्यास हात देतो रे?
फक्त बघते इथे मजा गर्दी!
केवढ्या सोडशील गाड्या तू
रोज असतेच ट्रेनला गर्दी!
झोप आली तरी कसा झोपू?
दिसते* झोपेतही अता गर्दी!
साफ ठेवा सदा हृदय तुमचे
होत जाते तिथे सुद्धा गर्दी!
(नोट: दिसते* मध्ये ते ची मात्रा लघु धरावी)
...................................................
अनिकेत सोनवणे 'असो'
छान रचना
ReplyDeleteइंग्रजी शब्दांचा सहज वापर
छान गझला अनिकेत. गर्दी विशेष आवडली.
ReplyDeleteदिसते मधला ते लघु घेतला आहे. अशी सूट उर्दू, हिंदी, गुजराती गझलांमधे सर्रास घेतली जाते. या विषयावर एक लेख मी या अंकात पण लिहिला आहे. असे करण्या मागचे "असो"चे कारण जाणून घ्यायला आवडेल.
आवडलं
ReplyDelete