गझल : सागर प्रकाश

 

१.

ठेवले दाबून आता हुंदक्यांना
थांबवावे पण कसे मी आसवांना

चार भिंतीआत त्याचा श्वास कोंडे
ओढ लागे धावण्याची पावलांना

हेरले आहेत वाडे चोरट्यांनी
का कळेना गस्त असता पोलिसांना

माणसे ही भोवती असतात सारी 
श्वास पण भिडणार नाही स्पंदनांना

वादळे येतात 'सागर' ही भयंकर
अंत कोठे संकटी मग यातनांना
.........................................
 
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर 'सागर प्रकाश'
मु. पो. कुर्डूवाडी,
जिल्हा सोलापूर

हल्लीचा पत्ता
अर्नेस्टिना, बी/एस - २,
थोरले भाट ताळगाव
पोस्ट करंजाळे
गोवा. पिन ४०३००२
९०११०८२२९९

1 comment:

  1. सुंदर

    ओढ लागे धावण्याची पावलांना

    ReplyDelete