दोन गझला : विनोद गहाणे

 

१.

साधक बाधक,चर्चा व्हावी
नको उगीचच लावालावी

शहरी जगात भटकत फिरतो
चल ना गड्या तू अपुल्या गावी

जपत वारसा बापाचा मग
केस कापतो सत्तू न्हावी

फक्त एकाच नजर भेटिला
वणवण फिरतो मी गोसावी

माझ्या तुझ्यात दरी वाढली
तू दादर अन् मी धारावी

मृत्यू माझा समीप येता
मज एखादी गझल सुचावी

भेट होईल नक्की अपुली
आपण दोघे चिनाब रावी

आवडला जर शेर गझलचा
लागलीच मग टाळी द्यावी

२.

नाती जपली मी प्रेमाने
माती जपली मी प्रेमाने

वार खुबीने केला त्याने
छाती जपली मी प्रेमाने

दवबिंदूवर मन अवतरले
पाती जपली मी प्रेमाने

माणुसकीच्या खोट्या गावी
ख्याती जपली मी प्रेमाने

दोषारोपण केले नाही
नाती जपली मी प्रेमाने
......................................

विनोद गहाणे

5 comments: