दोन गझला : प्रमोद वाळके

 

१.

पाहुनी निर्बलांची दशा देश हा आसवे ढाळतो
या कुपोषित जिवांना तरी सूर्यवंशी किरण पाजतो

हा सियासी घराणा जणू बांधतो चंद्रमौळी घरे
फेकुनी जाळ सागरतिरी लोकशाही जिवे जाळतो

जागवाना अता तर मती तनकटे धूर्त माजूरली
शेकटीचा नको खेळ तो पुंजक्यांनाच शिलगालतो 

घेउनी शपथ सदनामधी पेरतो विषमतेची बिजे
शिंपुनी रक्तओली धरा हलधरा वेदना वाढतो 

दहशतीच्या शिवारात मी जाऊनी हिंडलो एकदा
तेथला मर्त्य देहावरी आसवांचे कफन झाकतो 

बातबंबाळल्या या विजा थंड झाल्या युगंधर परी
क्रांततेने कराया लढा जागल्यांनाच अजमावतो

२.
 
वैखरीचा ताप होतो बहुपदांना काय देणे काय घेणे
या जिवाच्या काहिलीचे सावल्यांना काय देणे काय घेणे 

या तरी बरसा फुलांनो भेट देण्या सूर्य आला माळरानी 
अंधवादी भामट्यांचे या फुलांना काय देणे काय घेणे 

कालच्या घटनेत जळली धर्मनिरपेक्षी जनांची सभ्य वस्ती
कोण मेले कोण जळले या खुन्यांना काय देणे काय घेणे 

माय मेली दो जिवांची सांग मजला हाच का तो धर्मसंगर
खंतही याची नसावी दांभिकांना काय देणे काय घेणे 

या ढगांना फाटताना पाहुनी बेहाल झाली फार धरती
ध्वस्त झाले सर्व काही या विजांना काय देणे काय घेणे 

शूल आहे  फूल रक्षित बागवाना हेच ना जे सत्य आहे 
या गुलाबांच्या फुलांचे त्या शुलांना काय देणे काय घेणे 

पलटवारांचा धुमाकुळ रोज बघतो संसदेच्या प्रश्नकाळी
सांसदांच्या भांडणांचे वंचितांना काय देणे काय घेणे 

बा युगंधर सत्यवादा कर किनारा या मला दे प्रज्ञदीक्षा
सत्यवादी माणसांचे दशमुख्यांना काय देणे काय घेणे 
...............................................

प्रमोद वाळके ' युगंधर' 

1 comment: