१.
दाखवायला या जगास झगमग तुझी
वाढवत आहेस किती तू धग तुझी?
शांत राहण्याच्या तुझा हा अट्टहास
वाढवत आहे किती तगमग तुझी
हे कोणाच्या स्वागतास होतेय तयार?
देखणी आहे किती लगबग तुझी!
बाप झाला तू, समज की ती आता
आई आधी, बायकोये मग तुझी
जर स्वतःची नाहीये किंमत तुलाच
काय करणारे कदर हे जग तुझी?
काय हे? गझलेत उच्चारी वजन?
मोडणार हेमंत सगळे रग तुझी
........................................
हेमंत पुणेकर
No comments:
Post a Comment