१.
कशाला नटावे? कशाला सजावे?
शरीरापुढेही मला तू पहावे.
गवसले तुझ्यातच उद्याचे किनारे
जहाजास आता पुढे वल्हवावे.
दिखावा नि ताफा फुकाचाच माझा
तुझा स्पर्श होता पुन्हा विर्घळावे.
जगाच्या गुन्ह्याची सजा दे मला तू
गजाआडुनी पण मला तू दिसावे.
तुझी साथ नसता गझल पांघरावी.
गझलनेच आता मला थोपटावे.
२.
उन्हाळा जाळणाराही हसत मी हासरा केला
गुलाबी संपली थंडी तरी त्याच्या सुखासाठी
हसूनी चेहरा माझा जरासा लाजरा केला
दुपारी सावली माझी उन्हाला भेट केली मी
उन्हाच्या पायथ्याशी मी जरासा आसरा केला
मला ना साथ दैवाची...न उजवा हातही कोणी
भिकेला हात नियतीच्यापुढे मी डावरा केला
सहज तू ठरविले खोटे मला, मी चूक नसताना
तुझा तो बोल खोटा मी तुझ्यासाठी खरा केला!
तुटू दे तारका साऱ्या तुझ्या आकाशगंगेच्या
तुला मी वेचण्यासाठी पुढे हा घागरा केला
.................................................
प्रतिभा सराफ
9892532795
शरीरापुढेही मला तू पहावे...❤
ReplyDeleteकाय भुललासी वरलिया रंगा