गझल : जयप्रकाश सोनुरकर

 

१.

दरसाल चालते ही  तोटयात कास्तकारी
दृष्काळ नापिकीच्या ओझ्यात कास्तकारी

जिरली पुरीच दौलत शौकात खानदानी
घेणार ना पुन्हा ही डोक्यात कास्तकारी

दिसतो सदैव मजला कापूस तूर स्वप्नी
रात्री फिरून जाते डोळ्यात कास्तकारी

होणार भावबाजी  बाजार  चोरट्यांचा
अजुनी बुडून दिसते बोझ्यात कास्तकारी

एकेक वेचला मी दाना खळ्यातला अन
तेंव्हा कुठे झळकली पोत्यात कास्तकारी
..........................................

जयप्रकाश सोनुरकर
मानस मंदिर बॅचलर रोड , वर्धा
मो. नं. 9765547940

2 comments: