१.
कमी एकतेची समाजात आहे
म्हणूनी तफावत विचारात आहे
जगी माजलेला गदारोळ नुसता
खरी शांतता तरbस्मशानात आहे
मला हाव नाही हिरे माणिकांची
समाधान माझे शिवारात आहे
दगड होत आहे, मने माणसांची
उभी जिंदगी ही तणावात आहे
कधी ना मिळाले मनासारखे जग
कुठे सुख विटांच्या मकानात आहे
किती थोर आहे बघा भाग्य माझे
मला साथ त्याची उतारात आहे
कशी जीवना मी तुला साथ देऊ
तुझे सुख जगाच्या विरोधात आहे
....................................
निर्मला सोनी
व्वाह
ReplyDeleteसमाधान माझे शिवारात आहे