१.
गावात आठवांच्या जाऊन काल आलो
चुपचाप आसवांना गाळून काल आलो
मेंदीत राख त्यांच्या मिसळून लाल झाली
हातात भावनांना जाळून काल आलो
गजरा पळसफुलांचा पाहून हर्षिली ती
गज-यात आठवांना माळून काल आलो
"का भूक ठेवली तू? पोटात मानवाच्या"
साक्षात ईश्वराशी भांडून काल आलो
मैफिल मला जराशी ती वाटलीच परकी
मी श्वास काळजाचा रोखून काल आलो
'संजय' मनात ठेवू अपमान मी किती रे
दारात शब्द त्यांचे फेकून काल आलो
............................................
डॉ संजय रहाटे
वकाणा
डॉ संजय रहाटे
वकाणा
छान
ReplyDelete👌🌹🦚