एक गझल : सुरेश तायडे


१.
 
पर्वता सारखा लाभला जो मला
मित्र गोतावळा थोर जिवनातला

वेळ सांगून येते कुठे ,कोणती
ठेव तू सोबती मित्र हृदयातला

काय उन्मत्त तो होवुनी गर्जतो 
सागराच्यापरी ,शुद्ध निर्झर भला

तोच ओझ्यात गेला पुरा वाकुनी
बाप तो खांब होता कुटुंबातला

गौण ठरतील सारी तुझी उत्तरे
प्रश्न मोठा भुकेचाच पोटातला
...............................................

सुरेश नारायण तायडे,
मलकापूर
जि.बुलडाणा
मो क्र:- ८६६८८४४५४४

No comments:

Post a Comment