१.
अंगठा त्यांनीच माझा छाटला होता
सूर्य माझा यार ज्यांनी झाकला होता
आज शांतीचे धडे जे सांगती येथे
काळ रक्तानेच त्यांचा माखला होता
काल दरबारात हिंसा पाहिली मित्रा
देह श्रध्देनेच माझा बाटला होता
लेक येता जीव त्याने सोडला बापा
त्याचसाठी श्वास त्याचा दाटला होता
काय होता दोष माझा मारणाऱ्यांनो !
कोण परका कोण येथे आपला होता
..................................................
..................................................
सुरेश सायत्री किसन धनवे
काळ ...👌
ReplyDeleteलेक येता जीव त्याने सोडला बापा
ReplyDeleteत्याचसाठी श्वास त्याचा दाटला होता
बापरे खूप सखोल आहे तुमची गजल.