१
दे-घे झाली ,अन् मग पारित ठराव झाला
सोसत आली,चालत गेलो कितीतरी मी
वाटेलाही आता माझा सराव झाला
जाळिन म्हणतो सुर्यालाही क्षणात येथे
फारच बालिश अंधाराचा स्वभाव झाला
चोरुन नेतो माणुस त्यांच्या कलागुणांना
माकडजाती मधुनी एकच उठाव झाला
जेथे दिसल्या समचरणांच्या तुझ्या खडावा
तो कायमचा या माथ्याचा पडाव झाला
चालण्याची बस जरा तालीम होती
वाटही माझी तशी प्राचीन होती
वाहिली तू एक लाखोली उगीचच
माय त्याची केवढी शालीन होती
या जगाने पाहिले पाण्यात त्याला
हे खरे की रास त्याची मीन होती
एवढी सोपी नसे ती मत्स्यकन्या
लागली हाती तुझ्या धामीन होती
हारलो की जिंकलो मी हे कळेना
जिन्दगी माझ्या कुठे स्वाधीन होती
............................................
बाळ पाटील
No comments:
Post a Comment