गझल : अलका देशमुख

 

१.

पूज्य आहे आज लक्ष्मी जाणती जी माणसे
का तरी दारिद्र्य त्या'चे चाळती ही माणसे

देव वसतो अंतरी पण राक्षसी वृत्ती दिसे
का भुताच्या वारश्याने वागती ही माणसे..?

वाटल्याने वाढते ते ज्ञान सारे जाणती
शारदेला का रुप्याने तोलती ही माणसे...?

बोलण्याची ही तऱ्हा अन वागणे ढोंगी असे
जोडल्या हातासही का नाडती ही माणसे
  
देव देतो मागणाऱ्याला असूदे साव तो
मागणाऱ्या भीक देती ...नांदती ही माणसे
.................................................

अलका देशमुख

1 comment: