१.
किती आणखी सहन करावी ही जुमल्यांची हूल संसदे ?
किती काळ उघड्यावर मांडू ही दगडांची चूल संसदे ?
रिती गाडगी , तवा रिकामा , थंड चूल अन् मुले उपाशी
पिठ म्हणोनी मळू कितीदा 'अच्छे दिन'ची धूळ संसदे ?
पाच किलो तांदूळ किलोभर चणे देउनी घरी कोंबले
तेलमिठास्तव गहाण ठेवू ? काय पोटचे मूल संसदे ?
स्वातंत्र्याने अभिजनांच्या नांवे केले अमुचे खसरे
दिले आमच्या वाट्याला हे 'फूटपाथ' अन् पूल संसदे !
न्याय आंधळा शासन बहिरे , 'मिडिया' मिंधा 'भक्त' मेंढरे
तुला दिसेना आज भारता दिली कोणती भूल संसदे ?
समरसता समतेहुन सुंदर भासे आजघडीला कारण
समरसतेने पांघरलेली देशभक्तिची झूल संसदे !
खरेच जर का तुला वाटते मुळात समता समजुन घ्यावी
ऐक कधी तू 'वामन कर्डक' , वाच कधी 'बागूल' संसदे !
२.
दिसतात आज गांवे गळफास लावलेली
तारण जशी कुणाच्या कर्जास लावलेली
गोठ्यात बैल नाही दुसरा उपाय नाही
जोडी कुणी मुलांची वखरास लावलेली
कोसळ हवा तसा तू पण एकदा तरी बघ
ठिगळे किती ठिकाणी छपरास लावलेली
हे हात राबणारे लाचार का ? रिते का ?
किम्मत जरा तपासा घामास लावलेली
मेले किती भुकेने ! ऐकून भूक मेली
पोळी थिजून गेली ओठास लावलेली
जर यापुढे उपाशी गांवी मजूर मेला
एकेक वीट मोजू शहरास लावलेली
श्रमिकांस का नसावी देशात या प्रतिष्ठा ?
ती पुस्तके तपासा वर्गास लावलेली
ये ताकदीनिशी ये धमक्या नकोत पोकळ
ही शर्त वादळाच्या कहरास लावलेली
उजळावया जगाला जळतो दिव्याप्रमाणे
ही सूर्यशिस्त आम्ही जगण्यास लावलेली
......................................................
अशोक बुरबुरे
हिंगणघाट ,
हिंगणघाट ,
( 9970546236 )
What an exemplary writing, so contemporary!!!
ReplyDeleteYour words go straight to the soul. The way you describe, truly resonates the current scenario. Although there’s so much misery, injustice and negativity around us, you showcase a ray of hope by igniting the spirit of positivity and fighting for the right. Truly great!!! Love your writings to the core.
Dr. Pranita Burbure
अतिशय अप्रतिम आशयघन शब्द रचना. आज च्याच परिस्थिती चे एकूणच मोजमाप करणारी वास्तविकता. असेच फुला सारखे ऊमलत रहा. पुनश्च अभिनंदन. भाविक शंभरकर नागपूर
ReplyDeleteWas kaka great
ReplyDeleteएकेक वीट मोजू शहरात लावलेली......वा ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह अतिउत्तम.......जेवढी नाजुक तेवढीच कठोर........
ReplyDeleteनालंदा कांबळे, नागपुर
लेखनातला परखडपणा, तीव्रता वाखानण्याजोगी...
ReplyDeleteआजच्या लोकशाहीची आकलन करणारी अप्रतीम शब्दरचना. अभिनंदन
ReplyDeleteसंसद हा वेगळा पण अर्थपूर्ण आणि अनेक अर्थाने युक्त असलेला रदीफ योजून नवा आशय नवी उमेद नवी आशा घेऊन लिहिते झालेले गझलकार अशोक बुरबुरे यांची ' किती आणखी सहन करावी ही जुमल्यांची हूल संसदे ' ही गझल विचार करायला प्रवृत्त करणारी आहे. भारतात चाललेल्या सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक वातावरणाकडे एक दृष्टीक्षेप टाकला तरी अशोक बुरबुरेंना काय म्हणायचे आहे याचा आलेख डोळ्यासमोर उभा राहतो. ही गझल लिहिताना त्यांच्यासमोर भारतातील सामान्य माणूस होता. त्यामुळे त्यात येणाऱ्या शब्दांचे उपयोजन नेहमीच्या बोलण्यातील आहेत. वामनदादा कर्डक यांनी लिहिलेल्या गझलांमधील शब्दयोजनाही अशीच होती. यानुसारच शेवटचा शेर आलेला आहे.
ReplyDeleteही गझल मला खूप आवडली आहे. त्यामुळे ही गझल हासिल-ए-गझल आहे असेच मी म्हणेन.
खूप अर्थपूर्ण, वास्तववादी , मर्मग्राही, समर्पक गझला आहेत सर. खूप खूप शुभेच्छा ।,
Deleteसंसद हा वेगळा पण अर्थपूर्ण आणि अनेक अर्थाने युक्त असलेला रदीफ योजून नवा आशय नवी उमेद नवी आशा घेऊन लिहिते झालेले गझलकार अशोक बुरबुरे यांची ' किती आणखी सहन करावी ही जुमल्यांची हूल संसदे ' ही गझल विचार करायला प्रवृत्त करणारी आहे. भारतात चाललेल्या सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक वातावरणाकडे एक दृष्टीक्षेप टाकला तरी अशोक बुरबुरेंना काय म्हणायचे आहे याचा आलेख डोळ्यासमोर उभा राहतो. ही गझल लिहिताना त्यांच्यासमोर भारतातील सामान्य माणूस होता. त्यामुळे त्यात येणाऱ्या शब्दांचे उपयोजन नेहमीच्या बोलण्यातील आहेत. वामनदादा कर्डक यांनी लिहिलेल्या गझलांमधील शब्दयोजनाही अशीच होती. यानुसारच शेवटचा शेर आलेला आहे.
ReplyDeleteही गझल मला खूप आवडली आहे. त्यामुळे ही गझल हासिल-ए-गझल आहे असेच मी म्हणेन.
संसद हा वेगळा पण अर्थपूर्ण आणि अनेक अर्थाने युक्त असलेला रदीफ योजून नवा आशय नवी उमेद नवी आशा घेऊन लिहिते झालेले गझलकार अशोक बुरबुरे यांची ' किती आणखी सहन करावी ही जुमल्यांची हूल संसदे ' ही गझल विचार करायला प्रवृत्त करणारी आहे. भारतात चाललेल्या सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक वातावरणाकडे एक दृष्टीक्षेप टाकला तरी अशोक बुरबुरेंना काय म्हणायचे आहे याचा आलेख डोळ्यासमोर उभा राहतो. ही गझल लिहिताना त्यांच्यासमोर भारतातील सामान्य माणूस होता. त्यामुळे त्यात येणाऱ्या शब्दांचे उपयोजन नेहमीच्या बोलण्यातील आहेत. वामनदादा कर्डक यांनी लिहिलेल्या गझलांमधील शब्दयोजनाही अशीच होती. यानुसारच शेवटचा शेर आलेला आहे.
ReplyDeleteही गझल मला खूप आवडली आहे. त्यामुळे ही गझल हासिल-ए-गझल आहे असेच मी म्हणेन.
The Gazalkar present in its Gazal today'sreality the experience of present situation made Gazalkar to express his heart and he became successful to touch the hearts of others and his mind rebled against such a condition of workers , so he said if such a conditions prevailed further They will count the bricks of city but he failed to tell the means of change in his Gazal . Actually the sufferings of workers more severe that what the Gazalkar expressed in his Gazal. Here parliament used as symbol to which the Gazalkar think responsible so here we get slightest idea of his subconscious mind that he wants political change but How not mentioned here. Good efforts , i hope he will produce even better Gazals in future. Congratulations.
ReplyDeleteसुंदर गझला... वाह!
ReplyDelete