१.
जीव सारा फाटके शिवण्यात गेला!
तूच केला विस्तवाचा गारवा अन्
पावसाळा मग कुठे पाण्यात गेला!
कोण मृत्युचा खरा अन् कोण खोटा;
जिंदगीचा खेळ हे बघण्यात गेला!
तू उशीरानेच उघड़े दार केले;
बघ नशीबा वेळही जगण्यात गेला!
कायद्याशी खेळलो मी कायद्याने;
जन्म साला तारखा करण्यात गेला!
.......................................
- शशांक खंडारे
No comments:
Post a Comment