जगाचे तुडविणे सारे किती हे भोगतो रस्ता
कधी तक्रार केली का? तरीही नांदतो रस्ता
कुणाच्या जात धर्माचा कधी नसतोच हा रस्ता
कुणाच्या येरझाऱ्यांनी कधी का बाटतो रस्ता
तिच्या बाहेर येण्याने असे झाले असावे पण
तिचे रेंगाळणे पाहुन घसरला वाटतो रस्ता
फुलांच्या आज वाटेवर कसा हा टोचला काटा
तरी ध्यानात होते का विसरला वाटतो रस्ता
कुणीही पाहिले नाही कधी लाचार झालेला
असावा खानदानी तो मलाही वाटतो रस्ता
...............................
हरिपंडित सांगुळे
No comments:
Post a Comment