गझल : स्मिता साळवी


१.

गावाकडचे मोठ्ठे अंगण आठवते का?
पहाट ओव्या, सडा सारवण आठवते का?

कमानीवरी जाईचे मोहरले तोरण
मेंदीचे ते कुंपण बिंपण आठवते का?

सख्खे, मावस,आते,मामे सारे आपण
तरी कधी ना झाले भांडण .... आठवते का?

अतिथी आले कधीही तरी नव्हते दडपण
गरम भात अन मस्त कालवण ...आठवते का?

समृद्धींनी नटले सजले मस्त बालपण
दह्या दुधानी भरले रांजण आठवते का?

बेलपत्र अन फूल पांढरे शिवास अर्पण
किती मनोहर होता श्रावण आठवते का?

 ...............................................

स्मिता साळवी

No comments:

Post a Comment