१.
मनाची मनाशी दरी फार आहे
तिला सांधणारी कुठे तार आहे
स्मरू का ? पुन्हा मी तिच्या आठवांना!
तिचे प्रेम नुस्ताच व्यापार आहे
पुन्हा मांडला डाव मीही नव्याने
जरी घाव हृदयास अलवार आहे
रुजामे फुलांचे उचल फेक मित्रा
समाधीस माझ्या उगा भार आहे
विसरलो स्वतःला तिला पाहिल्यावर
मना वेधणारा तिचा वार आहे
अरे..! रक्त माझे तुझे सारखे तर
उभी राहिली का हि दीवार आहे
जगी एकट्याने जरी भांडलो मी
मला चांगले भाग्य मिळणार आहे
.
जयराम मोरे
सोनगीर
7709565957
छान
ReplyDelete