गझल : प्रसन्नकुमार धुमाळ

 


१.


प्रत्येक लेकराचा दृष्टांत बाप असतो
साक्षात अनुभवांचा वृत्तांत बाप असतो

हरएक संकटाशी लढतोय एकट्याने
साक्षात प्रेरणेचा हा प्रांत बाप असतो

करतो इथे शहाणे सांगून शब्दनीती
साक्षात सानुल्यांचा वेदांत बाप असतो

जगतो इथे खुशीने माणूसकी जपूनी
साक्षात जीवनाचा सिद्धांत बाप असतो

दाबून दुःख सारे हृदयात ठेवणारा
साक्षात वेदनेचा आकांत बाप असतो
 ...............................

प्रसन्नकुमार धुमाळ
मु.पो आलेगाव,ता.दौंड, जि. पुणे
Mobile No.8830801103
What's up.7875878866

1 comment: