१.
आटल्या साऱ्यांच विहिरी पावसाळा दूर आहे
जे पुढे दिसतेय माझ्या चित्र हे भेसूर आहे
फार घाई सोडण्याची जाहली माझ्या सुखाला
भेटण्याला दुःख माझे बघ किती आतूर आहे
मागताना मत जयांनी दाबल्या हातात नोटा
भ्रष्टतेचा पोसला त्यांनीच भस्मासूर आहे
यायचे तर ये जरा जोरात येथे पावसा रे
का उगी तू लावली नुसतीच ही भुरभूर आहे
विस्तवाशी खेळण्याचा नाद तू सोडून द्यावा
भोवताली ठेवला त्यांनी तुझ्या कापूर आहे
कुणी परका कुठे करतो कधी आघात वर्मावर
इथे अपुल्याच रक्ताचा खरोखर मारतो पाचर
कुणालाही कळू आला न इथल्या रंग मातीचा
किती आले इथे गझनी किती मेले इथे बाबर
नको हुरळून जाऊ तू तयांचा जीव वाचवता
तुझा हा जन्म झालेला स्वःताचा मानती चाकर
कुठे चर्चा तुझी झाली? कुठेही बातमी नाही
तयांना हसवण्यासाठी जणू झालास तू जोकर
तुला जातीत गुंतवले तुला धर्मात गुंतवले
गुलामाला गुलामीही कुठे येते कळू लवकर
कुणाशी बोलतो आहे कुणाला सांगतो आहे
तुझी मांडायला बाजू दिली संधी कुठे क्षणभर
३..
हवाही विषारी दवाही विषारी
कशी सांग घ्यावी मनाने उभारी
दिले तख्त हे रक्त सांडून त्यांनी
नको वाजवू ही तुझी तू तुतारी
........................................
बबन धुमाळ,
आलेगाव.ता.दौंड
जि पुणे. 413801
मो नं. 9284846393
छान गझला
ReplyDelete