गझल: शरद काळे

१.

रूढी परंपरेचे तोडून बंध सारे,
पंखात पाखरांच्या भरले तुम्हीच वारे..

हिनवून जीवनाला ओढून नेत होतो
राखे मधेच होते दमकोंडते निखारे..

आयुष्य काय होते? आम्ही जिवंत होतो? 
निर्जीव माणसांचे नुसतेच ते ढिगारे..

हा जन्म लाभला का? वाटे असे निरंतर
नव्हती कुठेच आम्हा उघडी कधीच दारे..

देऊन लेखणी तू आम्हा सशक्त केले
झोळीत वंचितांच्या तू टाकलेस तारे..

बाबा तुझ्यामुळे हे आयुष्य साध्य झाले
तुमच्या मुळेच आम्हा हे लाभले किनारे..
.............................................

शरद बाबाराव काळे
९८९०४०२१३५
धामणगांव रेल्वे

 

No comments:

Post a Comment