१.
फार प्रसिद्धीस आले नाव कोरोनामुळे
मी हजारो मैल चालुन पोचलो वेशीवरी
पण घरी जाण्यास नव्हता वाव कोरोनामुळे
सोसले होते व्यवस्थेचे हजारो वार मी
आज हृदयी खोल झाले घाव कोरोनामुळे
आज हृदयी खोल झाले घाव कोरोनामुळे
कोणत्या गर्वात होता आजवर तू माणसा?
शुन्य झाले बघ तुझेही भाव कोरोनामुळे
आखल्या होत्या जगाला जिंकण्या तू योजना
अन् तुझे उधळून गेले डाव कोरोनामुळे
अन् तुझे उधळून गेले डाव कोरोनामुळे
सातबारा जिंदगीचा कोणत्या लिहिणार तू ?
राहिला कोराच अवघा ताव कोरोनामुळे
बैसले सारे खुराड्यांनीच चोरासारखे
आढळेना आज कोणी साव कोरोनामुळे
शांतिदूता सोसण्याचे दे अम्हाला बळ नवे
पृथ्वीचे ना काय होइल ठाव कोरोनामुळे
आढळेना आज कोणी साव कोरोनामुळे
शांतिदूता सोसण्याचे दे अम्हाला बळ नवे
पृथ्वीचे ना काय होइल ठाव कोरोनामुळे
२.
भल्या पाह्यटी कुठी चालली बाभूईच्या बनात बाई ?
सुधा नाई हट्ऊकोरपना हे तुह्या वाळत्या वयात बाई
उगीच नोको इकळे तिकळे फिरू बिच्यारे पिशासारखी
भले मानसं उरले नाई कोनी आता ज्यगात बाई
मले कयेना तुले कईसा कुकवासंगं हयद लागली
कोनाच्या नावाची हाये पोत मन्याची गयात बाई ?
तवापसुन थो येळ्यावानी फिरते म्हन्ते गल्लोगल्ली
जवापसुन पाह्यली तुही लग्नाची त्यानं वरात बाई
आंबे, चीचा, आंबट-चिंबट तुले कसे खायावं वाटते ?
भिंतीची माती खायाचं काहुन येते मनात बाई ?
उजीळातनी सांग मले तू तुले कायचा भेव लागते ?
काहुन इझते अर्ध्या राती तुह्या दिव्याचीच वात बाई ?
३.
हळूहळू मज तुझे इरादे कळू लागले
अच्छे दिनही प्रत्येकाला छळू लागले
चढू लागला सत्तेचाही कैफ असा की
म्हातारेही तरणे बनुनी चळू लागले
महागाइच्या ओझ्याने वाकली माणसे
आयुष्याला हवे तसे ते दळू लागले
कोण बरोबर कोण चुकीचे कुणा कळेना
अपुले परके म्हणताना गोंधळू लागले
पंख छाटुनी अभिव्यक्तीला अपंग केले
दिशाहीन होउनिया पक्षी पळू लागले
दिशाहीन होउनिया पक्षी पळू लागले
पदव्युत्तर होउन तरुण या देशामध्ये
कुणी भजे अन् कुणी वडेही तळू लागले
ईव्हीएमच्या फवारणीने कमाल केली
मळे चहुकडे फुलांचेच दरवळू लागले
खरा चेहरा अता कुठे लागला कळाया
कोण कुणाचा गळा इथे आवळू लागले
अहंकार सोडून 'गौरवा' भान असूदे
भल्याभल्यांचे सिंहासन ढासळू लागले
४.
उदंड झाली असेल कीर्ति जगात माझी
अखेर अवहेलनाच झाली घरात माझी
अखेर अवहेलनाच झाली घरात माझी
तुझ्या धूर्त वांझ घोषणांनी मरू लागलो
कधीतरी ऐक एकदा 'मन कि बात' माझी
कधीतरी ऐक एकदा 'मन कि बात' माझी
कशी पांघरू झूल रेशमी अकादमीची
अभिव्यक्ती जर गुदमरते वादळात माझी
अभिव्यक्ती जर गुदमरते वादळात माझी
जेवण माझे काय असावे मला ठरवु दे
ओढतोस का पुढ्यातील तू परात माझी
ओढतोस का पुढ्यातील तू परात माझी
खुशाल इंद्रायणीत फेका पुस्तक आता
गझल कोरली रसिकांच्या काळजात माझी
मरावया केलेस मला मजबूर काल तू
आज सजवली प्रतिमा देवालयात माझी
कुठेच मी झाड एकही लावले न साधे
उगाच का जाळता चिता चंदनात माझी
कधीच कुठल्या दरात बघ मी विकलो नाही
करू नको 'गौरवा' कुठे जाहिरात माझी...
करू नको 'गौरवा' कुठे जाहिरात माझी...
.......................................
गौरवकुमार आठवले,
'प्रेरणा,' रो-हाऊस क्रमांक २,
पारिजातनगर, लोखंडेमळा,
जेलरोड, नाशिकरोड-४२२ १०१.
संपर्क ९४२३४७५३३६.
चारही रचना सुंदर
ReplyDeleteबोलीतील रचना छानच