गझलकार सीमोल्लंघन २०२०

गझलकार सीमोल्लंघन २०२० चे ऑनलाइन प्रकाशन करताना ख्यातनाम संगीतकार कौशल इनामदार 


.

मराठी रसिकांना मराठी गझलने चांगलेच वेड लावले आहे.मराठी गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देणाऱ्या, ख्यातकीर्त गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या 'गझलकार ' या मराठी गझलच्या ब्लॉगचा 'गझलकार सीमोल्लंघन 'हा वार्षिकांक दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने मागील बारा वर्षांपासून ऑनलाईन प्रकाशित होत असतो.

यावर्षी  'गझलकार सीमोल्लंघन २०२० ' ह्या ऑनलाईन अंकाचे प्रकाशन 'लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी ' या प्रख्यात मराठी अभिमान गीताचे तसेच 'बालगंधर्व ' 'अजिंठा ' अशा गाजलेल्या मराठी चित्रपटाचे संगीतकार कौशल इनामदार यांचे हस्ते नुकतेच संपन्न झाले.

सुरेशकुमार वैराळकर, श्रीकृष्ण राऊत आणि अमोल शिरसाट यांनी हा अंक संपादित केला आहे.

यंदा ह्या अंकात महाराष्ट्रभरातील १५७ मराठी गझलकारांच्या  गझला तसेच मराठी गझल संदर्भातील महत्वाचे दहा लेख समाविष्ट आहेत.

No comments:

Post a Comment