गझल : निलेश शेलोटे


 

१.


मलाच मीही सवाल केले
कठीण काही जहाल केले

कसे कळाले मला न हेही
कधी मला तू हलाल केले

हळूच ओझे दिलेस माथी
विवंचनेचा हमाल केले

करू म्हणालो हिशेब जेव्हा
कशास खोटे बवाल केले

विकून आलो नशीब ज्यांना
सुखास त्यांनी दलाल केले
...........................................

निलेश शेलोटे
 

1 comment: