१.
ठेवले खिशात दुःख, ओंजळीत आसवे
गात गात सागरात, सांडलीत आसवे
या भुकेस पीळ देत, पोट हासले जरी
भाकरीस पाहताच, पांगलीत आसवे
भावबंध तोडले हळूच, बोलघेवडे..
जात जात आपसात, भांडलीत आसवे
हुंदकाच भेटलाय, भेटते सखी जशी
करकचून पापणीस, बांधलीत आसवे
आरसाच हासतोय, चेहऱ्यास माझिया
का उगाच कुंडलीत, मांडलीत आसवे
सर्वकाळ भूकमार, प्राक्तनात आमच्या
कोरड्याच वाडग्यात, रांधलीत आसवे
सोड जात माणसा, अता तरी प्रगल्भ हो
जोडण्यास माणसास, सांधलीत आसवे
२.
हासून बोलणारा, ना हासतो कुणाला
राखेस यातनांच्या, तो फासतो उराला
छेडून दीपकासी, आयुष्य जाळले अन्
मल्हार राग आता, तो भासतो सुराला
विश्वास कोणत्या रे, नात्यावरी करावा
एकेक घात त्याच्या, 'आ' वासतो उशाला
घ्यावे पुन्हा जरासे, वाटे जगून जेंव्हा..
काळोख दु:खदायी, का ग्रासतो सुखाला
उत्साह दांडगा या, राजास राष्ट्रप्रेमी..
उलथून टाकलेल्या, तो तासतो मुळाला
आता तरी निघू द्या, स्वर्गीय त्या प्रवासा
खोट्याच आसवांच्या, तो त्रासतो पुराला
...............................
Jivnache vastav mandnarya gazala.
ReplyDeleteThanks sir ji... Appreciation boosts the efficiency🙏
Deleteअसून बोलणारा... अप्रतिम
ReplyDeleteआसवांची विविध रूपे भावली.🌷🦚
मनापासून धन्यवाद सर🙏😊
Deleteछान गझला विनोदजी! या दोन शेरांमधे प्रमाण बोली भाषेचा तुम्ही वापर केलाच आहे.
ReplyDeleteहुंदकाच भेटलाय, भेटते सखी जशी
करकचून पापणीस, बांधलीत आसवे
आरसाच हासतोय, चेहऱ्यास माझिया
का उगाच कुंडलीत, मांडलीत आसवे
तुम्ही पहिल्या गझलेत जे वृत्त घेतले आहे त्यात लघुंचा वापर जवळपास ५०% आहे. तुम्ही आहे (गागा) चे य (ल) घेतले आहे. अशी लवचिकता घेलता शिवाय अशे वृत्त चालवणे फार अवघड आहे.
मनापासून धन्यवाद हेमंत जी. आपले आर्टिकल खरंच प्रेरणादायी आहे. उच्चारानुसार मात्रेचा वापर करायला, शिकायलाही थोडा वेळ लागेल. पण आपल्या प्रश्र्नोत्तरांमुळे खूप मदत होईल.😊🙏
Deleteअप्रतिम गझला सर जी
ReplyDeleteमहेश जी, मनापासून धन्यवाद. 🙏😊
Deleteसुंदर गझल रचना ...दोघ ही
ReplyDeleteमनस्वी आभार🙏😊
Delete