एक गझल : शांताराम हिवराळे 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
१.

सागराने हा किनारा सोडलाआता
वादळाशी का घरोबा साधलाआता?

तोडले ते झाड आता राहिले नाही
सावलीचा आसरा का मोडला आता?

जीवरा रे!मी तुझ्याशी बोललो नाही
मी व्यथांचा भार माझ्या साहला आता

मी सुखाचे सोंग येथे आणले नाही
आतला आवाज माझा बोलला आता

वाटले की, मोकळा मी होत का नाही?
कोंडलेला श्वास माझा जाणला  आता

रक्तधागे गुंतलेले पाहतो आहे
रंग त्यांचा वेगळा का भासला आता

पावसाचा जोर आता वाढतो आहे
का मनाला घोर माझ्या लागला आता?

चिंब ओल्या ह्या तमाची रात ही भारी
दीप माझ्या अंतरीचा लावला आता.
..........................................
 
शांताराम हिवराळे

No comments:

Post a Comment